life without petrol

पेट्रोल ची गोष्ट

वर्ष 2040, आजचा दिवस

पेट्रोल व डीझल आता फक्त लष्करासाठी, राष्ट्रपतींसाठी व पंतप्रधानांसाठीच  आहे. शहरांमध्ये लोकांनी त्यांच्या गाडया जागा मिळेल तिथे सडकेवर सोडून दिल्या आहेत. लष्कराने इस्पीतळांचा, महत्वाच्या ठिकाणांचा ताबा घेतलेला आहे. अॅंबुलंस  आता फक्त गरंजूसाठीच आहे. महत्वांच्या आणि विशेष व्यक्तींसाठीच आता बाहेर  निघते.

पर्यायी वाहनांनी सडकेवर बऱ्यापैकी गर्दी केलेली आहे. सायकलींना बरे दिवस आले आहेत. बैलगाडी, घोडागाडी, सायकल रिक्षा आता सडकेवर मोठया प्रमाणात दिसू लागल्या आहेत. डीझल वर चालणारी रेल्वे आता परत वाफेच्या इंजीनावर चालत आहे. विजेवर चालणारी रेल्वे विजेच्या उपलब्धतेनुसार मार्ग सर करीत आहे

 

वर्ष २०३० आजचा दिवस

वास्तविक पाहता जे जे राष्ट्र पेट्रोलियम पदार्थांच्या पूर्तर्तेसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून असतात, ते साधारणतः 8 ते 12 आठवडे इतका साठा स्वतःकडे ठेवतात कारण् एकच भविष्यात काही बरेवाईट झाले तर, व्यवस्थापन नीट व्हावे. सध्या पेट्रोल पंप मालकांचा संप सुरू आहे. दुसऱ्या दिवशी काही पंप बंद झाले आहेत. पुढल्या तिन दिवसांत उरलेल्या सर्व पंपावरील माल संपेल. त्यापुढील दोन

दिवसात दुचाकिंचे पेट्रोल संपेल, आणखी चार दिवसांमध्ये ट्रक व कार जिथे आहेत,तिथेच उभे राहतील. यामध्ये मोठया शहरांमधील कचरा नेणाऱ्या गाडया,शव-वाहिका, दुधाच्या, औषधांच्या, मुलांना शाळेत नेणाऱ्या स्कुल बसेस असतील.ज्या शहरांमध्ये सी.एन.जी., एल.पी.जी. उपलब्ध आहे तेथे स्थिती थोडी वेगळी असेल गॅसवरचालणारी वाहने धावतील व पेट्रोल व डीझलची वाहने ठप्प होतील,

 

वर्ष २०२०

यश, एका मोठया कंपनीत मार्केटींग मॅनेजर आहे. देशभर फिरणे, लोकांना भेटणे. मार्केटच्या हालचालींवर नजर ठेवणे व ग्राहकांची मनस्थिती समजून आपला माल पुढे नेणे हे एकच काम. ग्रेस त्याच्याच आफिसमध्ये काम करणारी, त्याची जीवाभावाची मैत्रीण. गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचे आहे, आयुष्यात पुढे जायचे आहे अशी दोघांची सर्व साधारण स्वप्ने. बहुदा स्वप्नांच्या साधेपणामुळे वा सारखे

पणामुळेच दोघांच्या मैत्रीची विण घट्ट होती‘‘

अरे यश, एकलस काय ?

‘‘काय, ’’

‘‘अरे पेट्रोल 1000 रू. लीटर झाले आज उच्चांक म्हणावा की नीचांक हेच

कळत नाही’’.

‘‘हुं, महागाई अजून वाढेल’’

‘‘महागाई वाढेल म्हणजे अजून काय होईल’’ अगोदरच तर महागाई हाताबाहेर गेली आहे.’’

‘‘अरे कंपनी जिंदाबाद आहे ना. ती देईल पेट्रोल अलाउंस आणि तू कशाला काळजी करते आहेतस, मी आहे ना’’

‘‘कंपनी काय तुझ्या पगारापेक्षा जास्त पेट्रोल अलाउंस देणार आहे का ? सर्व नियम आता बदलतील. पहिल्या प्रायरीटीवर पेट्रोल वा ट्रांसपोर्टचा खर्च कमी करणे राहणार आहे. आता कंपनीत आहे त्याच खर्चात प्राफीट वाढवणे महत्वाचे राहणार आहे. आवश्यक तेव्हढे लोकं राहतील, बाकी सगळे जातील ’’?

ग्रेस माझ्याकडे यावर एक उपाय आहे

काय ?

‘‘आपण देाघांनी जर लग्न करून संसार थाटला तर ही महागाई परवडेल की नाही हे तर माहित नाही, पण एकमेकांच्या सेाबतीने ती जाणवणार नाही हे नक्की तू सोबत असशील तर हे ही दिवस निधून जातील’’

‘‘अरे काय वेळ पकडली आहे गंमत करायला  ?

अग, मी मनापासून बोलतोय. मला माझं उरलेलं आयुष्य तुझ्या सोबत घालवायला आवडेल. पण तुला मी आवडत नाही का’’?

 

नाही, असं नाही, मला वाटलं की तू कधीच विचारणार नाहीस तुझ्या साठीतर करीयर मैत्री प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते ना ’’?

पुढच्याच महिन्यात दोघांचे लग्न झाले. सहजीवनाला सुरवात झाली. महागाई व पेट्रोलच्या फटक्यामुळे सहजीवनात फक्त आवश्यक गोष्टींनाच स्थान राहीले.सगळयात पहीले गाडी विकल्या गेली. मिळेल त्या पैशात गाडीच्या जाण्याने, सरकारी वाहनाने प्रवास सुरू झाला, एक्सपंेसेस शेयरींग, गीवींग अप सारख्या शब्दांनी जोर पकडला. जुनी स्वप्न कल्पनातीत वाटावी अष्या स्थितीने जोर पकडला. नवी स्वप्न जगण्यावर आधारीत झाली. चैनीच्या वस्तु तर आवाक्याबाहेर गेल्या.

संपूर्ण देश पेट्रोलच्या वाढत्या कीमतीने बेजार झाला होता. इच्छा असूनही बऱ्याच गोष्टी शक्य नव्हत्या. डीझल शवदाहीनी वर आठवडया भराचे वेटींग होते. विजेची शवदाहीनीवरही वेटींग आले होते. गोरगरीबांनी तर लाकडांकडे आपला मोर्चा वळवला होता. आता लाकूडच तयांचे इंधन झाले होते. वरवारींना बरे दिवस येवू लागले हेाते. रस्त्याकाठच्या झाडांना तर लोकांनी कधीच कापायला सुरवात केली

होती.

नव्या कायदयानुसार परिवार वाढवण्याच्या इच्छुकांना अर्ज देऊन परवानगी घेणे आवश्यक केले गेले होते. इस्पीतळांच्या सोईनुसार, व्यवस्थेवर ताण न पाडता तारीख मिळत होती. ती तारीख मिस झाल्यास नव्याने परवानगी घेणे आवष्यक होते. हळुहळु

समाज व्यवस्था पेट्रोल डीझलचा ताण अॅडजेस्ट करीत होती. ही भविष्यातील येणाऱ्या दिवसांची फक्त चाहुल होती.विजेवर

चालणारया गाडया होत्या पण विजच नव्हती. विज अत्यावश्यक सेवेसांठी सर्व प्रथम नंतर ग्राहकांसाठी व सर्वात शेवटी चैनी साठी उपलब्ध होती.एल.पी.जी., सी. एन.जी. इथेनाल, हायड्रोजन कार, हे सर्व उपाय तोकडे पडत होते.याचावापर फक्त श्रीमंत लोकंच करू शकत होते. कारण हया गोष्टी अजून सर्वदूर पोचल्या नव्हत्या. पोहोचल्या नसल्यामुळे सर्वमान्य नव्हत्या आणि वाढत्या कीमतीमुळे

सामान्यांच्या अवाक्याबाहेर होत्या.

प्रचंड प्रमाणात अस्थीरता साचली होती. लोकांची डोकी भणभणली होती.जगण्यासाठीचा संघर्ष प्रचंड झाला होता. लवचिकता हा मनुष्याच्या जगण्याचा अत्यंत महत्वाचा नियम असल्याने तो जगत होता. परीस्थितीशी जुळवुन घेत होता. फक्त

साधनांची सवय झालेले त्याचे शरीर त्याला मनाने थकवीत होते.

 

वर्ष २०३५

आज शासनाने अधीकृतरीत्या घोषणा करून संगितले की खाडी देशातील अस्थीर वातावरणामुळे भारताला तेल मिळणे कठीण झाले असून, तत्काल प्रमावाने पेट्रोल, डीझल, केरोसीन विक्रीस बंद करण्यात येत आहे.सद्या घटकेस आपल्याकडे चार आठवडे पुरेल इतकाच तेलसाठा असून, आपण आता पर्यांयी इंधनांकडे वळणार आहेात. लोकांनी आपली जीवन पध्दती थोडी बदलावी.

‘‘यश, तू कुठे आहेस’’

‘‘ग्रेस, मी मदुराईला आहे,’’

‘‘अरे मुंबईत काय घोळ सुरू आहे, माहित आहे का ? पेट्रोल पंप लुटल्या जाउन राहीले आहेत. गाडया अडवून चाकुचा धाक दाखवून पेट्रोल लुटुन राहीले आहेत. लोकल मोजक्या वेळांमध्येच सुरू आहे. सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास बस सेवा कधीही बंद पडु शकते. मदुराईला काय स्थिती आहे?

‘‘आम्ही इथे सायकलींवर फिरतो आहे. चेन्नईला जाणरया प्रायव्हेट बसचे तिकिट विमानापेक्षा महाग झाले आहे. सडकेवर ठीकठीकाणी कार आणि बाईक्स सोडून दिलेल्या आहेत. काही ठिकाणी एल.पी.जी. आटो आहेत पण अत्यंत महाग.

पेट्रोलंपप ओसाड पडले आहेत. मदूराई स्टेशनच्या सर्व गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.

बाप रे,

मग तु घरी परत कसा येशीलल ?

‘‘जस मला काही मिळेल तसं मी घरी पोहोचायचा प्रयत्न करतो. चेन्नईला जावून रेल्वेने येईन. तरी आठवडा भर लागेल. कारण वीज जर असेल तरच ट्रेन पुढे जाईल. नाहीतर बसा बोंबलत जंगलात. तू काळजी घे, येण्याची व्यवस्था असल्याशीवाय घरातून निघू नको

आजचा दिवस साल २०४०

शासनाच्या एका कठोर निर्णयामुळे पेट्रोल, डिझल व इतर पेट्रोलियम पदार्थ कोणे एकेकाळी हया देषात होते हया स्थितीत आले होतेदेश

एकच होता. पण काही प्रमाणात अंतर्गत तुकडे झाले होते. काही राज्यांमध्ये शासकीय तेल कंपन्यांच्या तेल साठयांवर तेथल्या बाहुबलीनी केव्हाच कब्जा मिळवला होता. पेालिस कारवाईच्या भीतीने एक दोन ठिकाणी सगळा साठा पेटवून देण्यात आला होता. तेव्हापासून शासन यांच्यापासून दोन हात दूरच आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये शासकीय रीफायनही होत्या तेथे माफीयांनी टोळी सुध्दा रंगवले आणि रीफायनरी काबीज केल्या आज सत्ता आणि पैशांचे ते नवे केंद्रस्थान व माफिया नवे संस्थानिक झाले आहेत. प्रायव्हेट रीफायनरी तर कधीच संस्थानांमध्ये बदललेल्या आहेत. स़त्ता व पैशांचे हे दुसरे महत्वाचे केंद्रस्थान पण हे, भारतात पुरवठा करीत नाहीत, ते जगावर राज्य गाजवतात, संपूर्ण जगाला आपल्या रीफायनरीतून पुरवठा करून काळा पैसा मिळवतात. एक प्रकारचा छोटा, स्वतंत्र देश असल्यासारखे वागतात.सैन्य बाळगतात.

 

आपल्या रीफायनरीच्या संरक्षणासाठी अफगाणणीस्ताना सारखी यादवी, व अन्य राज्यांमध्ये माजली. सत्तेचे परीमाण पेट्रोल साठा झाले. शहरांबाहेरील तेल कंपन्यांचे साठे आता टोळयांच्या हातात आहे.हलदीया, उरण, मेरठ व अन्य ठिकाणांचे तेल साठे आता बंदुकीच्या धाकावर उपलब्ध आहेत.तेलाचा एकही टॅंकर आता एक किलोमीटर ही स्वतःच्या भरवस्यावर जाउ शकत नाही. त्याला सशस्त्र सोबती हे लागतातच. गुजराथ मधील हजीरा आती नवे मुंबई वा दिल्ली झाले आहे. कृष्णा गोदावरीमध्ये सी.एन.जी. आहे पण लुटल्या जात

असल्यामुळे तो कुठेच पोचु शकत नाही आहे. देषातील सी.एन.जी.ची पाईप लाईन कधीच तोडून विकण्यात आली आहे. गॅस आधारीत पावर प्लांट कधीच बंद पडले आहेत.कोळसा आता नवा रूपया झाला आहे आणि तो खणखणीत आहे. देशातील कोळशाच्या मुबलकतेमुळे अर्थव्यवस्था आता कोळस्यावर आधारीत झाली आहे. मोठे वा छोटे उद्योग धंदे कोळस्यावर आधारीत आहे. घरांमध्ये वापरासाठी

 

कचरागाडीप्रमाणे रोज घरी येवून रोजचा कोळसा मिळतो. थोडे कमी जास्त होतं,पण लोकं एक मेकांना सांभाळुन घेतात. विज आहे, पण फक्त 3 तास, जेवणासाठी शेगडया आहेत. घरांपासून, फ्लॅट पर्यंत शेगडया आहेत. रेल्वेने जुने वाफेचे इंजीन

परत वापरायला घेतले आहे. रेल्वे वीज व वाफेच्या इंजीनाच्या उपयोगाने माफक प्रमाणात ठीक चालु आहे. पण प्रवासाचा अवधी दहा पटीने वाढला आहे. गाडया दिवसा मोजक्याच चालतात व रात्रभर थांबतात. मधल्या काळात लोकांनी इंधनासाठी जंगल कापून साफ केली आहेत.

horse-cart-33243_1280जनजीवन सायकल, बैलगाडी, छकडे यावर पतर आले आहे. घोडा, टांगा परत दिसू लागले आहेत. बैलगाडीवर जाउन लोक आफीसात कंप्युटर वर काम करतात. मोबाईलवर बोलतात. लॅडलाईन फोनला आता बरे दिवस आले आहेत. आज ते संवादाचे सर्वात महत्वाचे कारण आहे कारण त्याला विज कमी लागते. परीवर्तनाचे,मजेशीर दिवस आले आहेत.पण्  पुर्वीसारखे दिवस आता राहीले नाहीत.

 

जीवनाची गती कमी झाली.

दिल्लीला जायच आहे ? 4 दिवस माल चेन्नईला पाठवायचा ? 1 महीना मंबईला नातेवाईक वारले ? तिकडेच आटपा. थांबू नका

 

आता सडकेवर जाडे लोक फारसे दिसत नाही. शुगर, डायबेटीस, स्ट्रेस, हार्ट अटॅक हे शब्द कमी ऐकायला येतात. आता लोकं पायी चालतात, कामाची घाई करीत नाही. एक दुसर्यांच्या वेळेचा आदर करतात. आणि आता सगळयांना हे कळल आहे की प्रकृती ने दिलेल्या मदतीचा जर दुरूपयोग केला तर कष्टांचेच फळ मिळेल म्हणून सर्व गोष्टींचा योग्य वापर करून सुखदायी, फलदायी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 4 =